राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनामध्ये मंगळवारी उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत वाढ केली. नवीन महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना १० जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंकज भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj bhujbals interim bail extended upto 10 june