दुष्काळग्रस्त भागातील सेल्फीमुळे वादात सापडलेल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री यांच्यावर विरोधकांनी चौफेर टीका सुरू आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या नव्या आरोपांची भर पडली आहे. नवाब मलिक यांनी पंकजा यांचे पती चारूदत्त पालवे हे एका दारू कारखान्याच्या संचालकपदावर असल्याचा दावा केला आहे. चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरीचे संचालक आहेत. शेंद्रा एमआयडीसीत रॅडिको डिस्टिलरी आहे. या कारखान्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे पंकजा मुंडे याही संचालक होत्या. आता त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे, असे नवाब मलिक यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. त्यामुळे पंकजा यांच्या दारू कारखान्यांचे पाणी तोडू नका, या विधानामागे वैयक्तिक स्वार्थ असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. लोकांना प्यायला पाणी नसतांना स्वतःच्या बियर कारखान्याकरिता पाणी वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ लावणाऱ्यांनो , जनता माफ नाही करेगी , असेही मलिक यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा