राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आघाडीवर असून ११ डिसेंबर २०१४ ते जून २०१५ या कालावधीत झालेल्या २८ बैठकांपैकी ९ बैठकांना त्या अनुपस्थित राहिल्या.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळातील उपस्थितीची माहिती मागितली होती. अवर सचिव नि.भा. खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ बैठकांपैकी पंकजा मुंडे ९, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ िशदे ७, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत ६, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ५, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले ५ बैठकांना अनुपस्थित होते. ही माहिती मुख्य सचिव कार्यालयाने दिल्याचे गलगली यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची सर्वाधिक दांडी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आघाडीवर
First published on: 02-08-2015 at 04:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja absent on meeting