प्रश्न उपस्थित होताच बालकल्याणमंत्र्यांचा संताप
गेल्या वर्षी चिक्की घोटाळ्यावरून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी चिक्कीचा धसका घेतलेला दिसतो. कारण या संदर्भातील प्रश्न बुधवारी विधानसभेत उपस्थित होताच पंकजाताई संतापल्या आणि त्यावरून गोंधळ झाला.
चिक्की खरेदीबाबत काँग्रेसचे अमिन पटेल यांनी विचारलेला प्रश्न पुकारला गेला असता प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांबाबत पंकजाताईंनी काढलेल्या उद्गारावरून विरोधी सदस्य संतप्त झाले.
ते वादग्रस्त विधान अध्यक्षांनी कामकाजातून काढून टाकले असले तरी मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांबाबत काही आक्षेपार्ह उद्गार काढणे किंवा त्यांच्या हेतूविषयी शंका घेणे उचित नाही, असे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. यावरून गोंधळ सुरू असताना साऱ्या चिक्की खरेदीची न्यायालयीन चौकशीची मागणी विखे-पाटील यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा