महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील चिक्की घोटाळ्याच्या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ, चटई आणि पुस्तकांच्या खरेदीच्या नियमांचे उल्लंघन करत २०६ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप झाला आहे, असा आरोप करून त्याची एसीबीमार्फत चौकशीची मागणी हेमंत पाटील यांनी याचिकेद्वारे केली आहे. एवढेच नव्हे तर गरज भासल्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान पंकजा यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने सोमवारी राज्यात आंदोलन केले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2015 रोजी प्रकाशित
पंकजांच्या चौकशीसाठी न्यायालयात धाव
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील चिक्की घोटाळ्याच्या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करावी,
First published on: 30-06-2015 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde chikki scam in court