मुंबई : पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही गाडी नसून पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्या नावे बीएमडब्ल्यू (२५.४० लाख रुपये) आणि स्कॉर्पिओ गाडी (८.१४ लाख) या गाड्या आहेत. पंकजा व त्यांच्या पतीची सुमारे ४६ कोटी ५० लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.
● दोघांकडे एकूण १६ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची जंगम मालमत्ता (समभाग, ठेवी व अन्य)
● त्यात ६५० ग्रॅम सोने (सुमारे ४६ लाख रुपये) आणि ६ किलो चांदी (४.६० लाख रुपये) आणि ४.४५ लाख रुपयांचे जडजवाहीर
● सुमारे ७० लाख रुपयांची शेतजमीन आणि २९.५५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता
● सुमारे २७.५० कोटी रुपयांची कर्जे व देणी
● शिक्षण बीएस्ससी
मिलिंद नार्वेकर ६० कोटींचे धनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर तब्बल ६० कोटींचे धनी असूनही त्यांच्या कुटुंबाकडे वाहन नाही. तसेच इयत्ता १० वीपर्यंतचे शिक्षण झालेल्या नार्वेकर यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नसून विविध वित्तीय संस्थांचे दोन कोटी ८० लाखाचे दायित्व आहे.
हेही वाचा >>>महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी
जंगम मालमत्ता: नार्वेकर यांची ४२ कोटी ६४ लाखाची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये १६५ तोळे सोने, ३१ किलो चांदी, २७३.३३ कॅरेट हिरे तसेच महागडी पेंटींग्ज, भेटवस्तू, विविध वित्तीय संस्थेतील ठेवींचा समावेश आहे.
स्थावर मालमत्ता: विविध ठिकाणी शेतजमीन, व्यापारी मालमत्ता, घरे अशी १७ कोटी ३५ लाखाची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये दापोली, आष्टी- बीड येथे शेतजमीन तसेच बंगळुरू (कर्नाटक) येथे व्यापारी जमीन, मुंबईत, मालाड, पवई आदी विविध ठिकाणी घरांचा समावेश आहे.
दायित्व: विविध वित्तीय संस्थांचे दोन कोटी ८० लाखाचे दायित्व.
शेकापचे जयंत पाटील ४६ कोटींचे मालक
● त्यापैकी जंगम मालमत्ता सुमारे १५ कोटी रुपये, त्यात सोने ७१५ ग्रॅम
● स्थावर मालमत्ता ३१ कोटी लाख रुपये
● कर्ज सुमारे १८ लाख रुपये
● शिक्षण दहावी उत्तीर्ण