मुंबई : राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची ही विशेष मोहीम असून, ३० जिल्ह्यांतील १५३० गावांमध्ये ही रथयात्रा नेली जाणार आहे. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना आदी २० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत ‘पाणलोट विकास घटक २.०’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत जानेवारीपासून राज्यात पाणलोट रथयात्रा काढण्यात येत आहे. पाणलोट रथयात्रेस १५ ते २० जानेवारीदरम्यान प्रारंभ होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ या तीन प्रदेेशांत तीन रथ प्रचार करतील. ६० ते ८० दिवस ही यात्रा चालणार आहे. राज्यात पाणलोटचे १४० प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांच्या अंतर्गत १९० गावे असून परिसरातील १५४० गावांमध्ये रथयात्रा जाणार आहे. रथयात्रेदरम्यान ‘माय भारत’ पोर्टल ॲपद्वारे हाती माती घेऊन मृद व जलसंरक्षणाची गावकऱ्यांना शपथ दिली जाईल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
22 girls in government hostel poisoned in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वसतिगृहातील २२ मुलींना विषबाधा
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Mumbaikars await cold weather
थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हा, महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई

वृक्ष लागवड करणे, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम रथयात्रेत होणार आहेत. यात्रेदरम्यान पाणलोट योद्ध्यांची तसेच ‘धरिणी ताई’ यांची पाणलोट जनजागृती करण्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेतील सहभागी युवकांची ‘माय भारत पोर्टल’मार्फंत नोंदणी करण्यात येईल. यात्रेत फिरते मोटार चित्रपटगृह असेल, त्यात गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येणार आहे. यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाणार आहे.

हेही वाचा – मुंबई : पालिकेच्या जी दक्षिण विभागात नागरिकांसाठी टोकन सुविधा; वरळी, प्रभादेवीवासियांना दिलासा

रथयात्रा लोकचळवळ व्हावी : राठोड

पाणलोट रथयात्रेचे नियोजन करताना स्वयंसेवी संस्थांच्या सूचना विचारात घ्याव्यात. यात्रेचा प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम बनवावा. अधिक गावांमध्ये रथयात्रा पोहोचावी, असे मार्ग ठरवण्यात यावेत. रथयात्रेदरम्यान जुन्या पाणलोटाच्या दुरुस्तीचे कामे हाती घ्यावीत. ही मोहीम शासकीय कार्यक्रम न राहता लोकचळवळ व्हायला हवी, अशा सूचना विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

Story img Loader