मुंबई मध्य रेल्वे मार्गावर आज (गुरूवार) सकाळी दोन लोकल गाड्यांचे पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कळवा आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात या दोन लोकलचे पेंटाग्राफ तुटले आहेत. त्यामुळे कल्याण-ठाणे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेचे अत्यावश्यक सेवेच्या पथकामार्फत दोन्ही रेल्वेगाड्यांना इंजिनच्या मदतीने खेचून मार्गस्थ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळची वेळ आणि त्यात मध्य रेल्वेचे विस्कळीत सेवेचे रडगाणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आणखी वाचा