|| इंद्रायणी नार्वेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्थानिकांची नाराजी; अतिक्रमण केल्याचा आरोप
मुंबई : परळ-भोईवाडा येथील सदाकांत ढवण उद्यानात सध्या पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे काम सुरू असून या उद्यानाचा काही भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजी पसरली असून हे मैदान हडप केले जाणार असल्याची भावना रहिवाशांमध्ये पसरली आहे.
पालिकेने या मैदानाच्या बाहेर फलक लावला असून त्यावर हे काम ७४ महिने म्हणजेच सहा वर्षे चालणार असल्याचे म्हटले आहे. परळ, शिवडी, वडाळा, नायगाव, कुर्ला तसेच भायखळा या भागांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी या ठिकाणी जलबोगदा खणण्याचे काम सुरू आहे.
या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मैदानाच्या एका बाजूला बीडीडी चाळी, दुसऱ्या बाजूला भोईवाडा पोलीस स्टेशन, भोईवाडा कोर्ट, थोडे पुढे सेंट पॉल हायस्कूल, नवभारत हायस्कूल, टाटा रुग्णालय, हाफकिन संस्था आहे. या परिसरातील कामगार वस्त्यांमध्ये दहा बाय बाराच्या घरात राहणाऱ्यांसाठी हे मैदान खूप आवश्यक असून सध्या ते विकासकामाच्या नावाखाली उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप नागरिक कृती मंचच्या वतीने तृप्ती राणे यांनी केला.
याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचे उपप्रमुख अभियंता शिरीष उचगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा सुधारण्यासाठी घाटकोपरच्या हेगडेवार उद्यानापासून प्रतीक्षानगर आणि उद्यानापर्यंत एक जलबोगदा टाकण्यात येणार आहे. त्यासाठी ३०० फूट खोल खड्डा खणला जात आहे. सहा वर्षे काम सुरू राहणार असले तरी मैदानाचा केवळ एकतृतियांश भाग वापरला जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर मैदान जसेच्या तसे लोकांना वापरता येणार असल्याची माहितीही उचगावकर यांनी दिली. हे मैदान साडेसहा हजार चौरस मीटर मोठे असून त्यापैकी केवळ १७०० चौरस फूट जागेवरच काम सुरू आहे. त्यातील लहान मुलांची खेळणी आम्ही सुरक्षित ठिकाणी हलवून तो भागही लवकरच सुरू करणार आहोत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जलबोगद्यातील पाण्याचे वितरण करण्याचे जाळे हे याच मैदानाच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे या जागेची निवड करण्यात आली आहे. आजूबाजूला लहान गल्ल्या असल्यामुळे रस्ते खोदून जलवाहिन्यांचे जाळे हलवणे शक्य नाही. – शिरीष उचगावकर