अक्षय मांडवकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेट्रो ४, ६, ९ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या शहरांत विणण्यात येत असलेल्या मेट्रोच्या जाळय़ामुळे रस्तेवाहतुकीला काही ठिकाणी अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मेट्रो पुलाखालून मार्गिकेला समांतर जाणारे उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) बांधण्यात येणाऱ्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली (मेट्रो ४), दहिसर ते मीरा-भाईंदर (मेट्रो ९) आणि स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी (मेट्रो ६) या मेट्रो मार्गामध्ये या पद्धतीचे पूल उभारण्यात येणार आहेत.
‘वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो-१’च्या निर्मितीनंतर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि मेट्रो ३ मार्गिकेच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने दहिसर ते मीरा-भाईंदर या ‘मेट्रो-९’ आणि अंधेरी ते आंतराष्ट्रीय विमानतळ या ‘मेट्रो-७ अ’ मार्गिकेला हिरवा कंदील दाखविला. काही भागांत होणारी वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीला गती देण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने मेट्रो मार्गिकांमध्ये पुलांचा समावेश केला आहे. वाहनांची ये-जा सुरळीत करण्यासाठी पुलांची निर्मिती केली जाणार आहे. हे पूल दुमजली आणि मेट्रो मार्गिकेच्या खालच्या बाजूने समांतरपणे जातील तर, काही ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला वळतील.
‘वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो -४’च्या ३२ किलोमीटरच्या उन्नत मार्गिकेत तीन ठिकाणी मार्गाची रचना या पद्धतीची असेल. वाहतूक कोंडी असलेल्या भाईंदर पाडा, कासारवडवली आणि आनंदनगर भागात हे पूल असतील. १० किलोमीटरच्या ‘दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो ९’च्या मार्गिकेतही पुलांचा समावेश करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर आणि दहिसर अशा दोन ठिकाणी मेट्रो मार्गिकेच्या खालून वाहनांना ये-जा करण्यासाठी पूल असतील. जोगेश्वरी-व्रिक्रोळी जोड रस्त्यावर पालिकेने बांधलेला एक पूल वाहतुकीसाठी खुला आहे. ‘स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो ६’ची मार्गिका त्या ठिकाणाहून जात असल्याने या पुलाच्या एका वळणाच्या टप्प्याचे काम अपूर्ण आहे. हा पूल मेट्रोलगत असेल.
उन्नत मार्ग असे..
या रचनेत वरच्या बाजूने मेट्रो मार्गिका जाईल, तर खाली असलेल्या उन्नत मार्गावरून वाहने जातील. असा दुमजली उन्नत पूल नागपूर मेट्रोसाठी बांधण्यात आला आहे. मुंबईतील तीन मेट्रो मार्गिकांमध्येही जिथे वाहतूक कोंडी जास्त होते अशा पद्धतीचे पूल बांधण्यात येणार आहेत.