मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर १० महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार  दाखल केली होती.