अरूणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या मुलांना सहभागी करून घेण्याचे आदेश तायक्वांदो फेडरेशनला द्यावेत, या मागणीसाठी २० विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आपली मुले ही राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्ण व रौप्य पदक विजेते आहेत. मात्र ‘तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’मधील अंतर्गत वादाचा फटका त्यांना बसत आहे. परिणामी पात्र असूनही राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये त्यांना, सहभागी करण्यात आले नाही, असा आरोपही याचिकेत केला आहे.    

Story img Loader