लग्न ठरवायचे म्हटले की दोन कुटुंबांतील व्यक्ती महिनोंमहिने तुडुंब खरेदी आणि विविध नियोजनांच्या मागे स्वार होतात. हिंदी चित्रपटांतील ‘छायागिती’ नसले, तरी व्यापांचा नाच कुटुंबांतील वडिलधाऱ्यांसोबत तरुणतुर्कानाही चुकत नाही. लगीनगोंधळाच्या व्यापगर्दीत गुप्तहेरवारीचा आणखी नवा व्याप जोडला गेला आहे. लग्न झाल्यानंतर वधू किंवा वराकडून होणाऱ्या फसगतीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने नियोजित वधू-वराची खरी माहिती काढण्यासाठी पालकांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही, तर लग्न जमविणाऱ्या संकेतस्थळांनीही फसवणुकीमुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी गुप्तहेरांकडे धाव घेतली आहे.
धावपळीच्या आजच्या काळात लग्न जमविण्यासाठी कमी वेळ असतो. अनेकदा वधू-वर परदेशातून केवळ लग्न करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळे लग्न जमविणाऱ्या संकेतस्थळांकडे लोकांचा कल असतो. परंतु त्यात दिलेली माहिती अनेकदा खोटी निघते. ‘तोतया’ वरांनी संकेतस्थळांवर जाहिराती देऊन मुलींची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस येतात . वधु किंवा वराची खरी माहिती काढणे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यामुळे खासगी गुप्तहेरांकडे जाण्याचा कल वाढला आहे.साधारण आठ ते पंधरा दिवसांत गुप्तहेर सर्व माहिती काढून देतात. त्यासाठी पस्तीस हजार रुपयांपासून अगदी एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचा दर आकारला जातो.
जोडी जमवण्याआधी पालकांची गुप्तहेरवारी!
लग्न ठरवायचे म्हटले की दोन कुटुंबांतील व्यक्ती महिनोंमहिने तुडुंब खरेदी आणि विविध नियोजनांच्या मागे स्वार होतात. हिंदी चित्रपटांतील ‘छायागिती’ नसले, तरी व्यापांचा नाच कुटुंबांतील वडिलधाऱ्यांसोबत तरुणतुर्कानाही चुकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-12-2014 at 06:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parent spy over daughter and son before get marriage