मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्याच्या पुढाकाराने कार्यरत असलेल्या ‘परिवर्तन, एक बदल’ या सामाजिक संस्थेच्या तसेच कर्तव्य फाउंडेशन यांच्या विद्यमाने अलीकडेच मराठी तरुणांसाठी ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला.
‘पितांबरी’ उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, अजित मराठे, अरुण दरेकर, तळवलकर ग्रुपचे मधुकर तळवलकर, मुंबईच्या डबेवाल्यांवर डॉक्टरेट करणारे डॉ. पवन अग्रवाल, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, सिने अभिनेता श्रेयस तळपदे, अतुल राजोळी असे ख्यातनाम मराठी उद्योजक उपस्थित होते. ‘आज जे मराठी उद्योजक प्रगतीपथावर आहेत त्यांनी आपले विश्व मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज उभे केल. मराठी उद्योजकांना मदत करण्यासाठी ते सतत तत्पर असतात. ‘मी उद्योजक होणारच’ यासारखे उपक्रम मराठी माणसाच्या हितासाठी होत रहावेत’ असे यावेळी सर्वानी नमूद केले. ‘मी उद्योजक होणारच’ चे निलेश मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समिरा गुजर यांनी केली. हेमंत मोरे, जीवन भोसले ,भालचंद्र पाटे , संजय चौकेकर, संतोष विचारे, बाला पवार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.

Story img Loader