भाईंदर ते गोरेगाव आगार मार्गावरील बेस्टच्या बसमधून सोमवारी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले. व्ही. के. सदानंद (५०) असे त्यांचे नाव आहे.
बस क्रमांक ७०७ मधून व्ही. के. सदानंद सकाळी प्रवास करीत होते. बस सकाळी ८.१० च्या सुमारास दहीसर बस थांब्याजवळ आली असता सदानंद यांनी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे बसवाहक वसंत बाळखेले यांना सांगितले. बाणखेले यांनी तात्काळ त्यांना भगवती रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ८.२५ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
बसमध्ये त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली, असे सूत्रांनी सांगितले.
सदानंद यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच बेस्टच्या वाहतूक अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच सदानंद यांच्या मुलाशी संपर्क साधून त्याला घटनेची माहिती दिली.
‘बेस्ट’ बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
भाईंदर ते गोरेगाव आगार मार्गावरील बेस्टच्या बसमधून सोमवारी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले. व्ही. के. सदानंद (५०) असे त्यांचे नाव आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-01-2013 at 04:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passanger dead due to heart attack in best bus