मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर शुक्रवारी दुपारी अचानक मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे वाशी-पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. या मार्गावरील ठाण्याच्या दिशेची वाहतूक एक तास बंद ठेवण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी ऐरोलीजवळ उपनगरी रेल्वेचे तीन डबे रूळावरून घसरल्याने दुपारी १.१५ ते २.१५ या काळात ऐरोलीजवळ हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकची कल्पना मध्य रेल्वेच्या अनेक अधिकाऱ्यांनाही नसल्याचे सांगण्यात येते. अचानक घेण्यात आलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.  यामुळे या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा