लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तत्काळ तिकिटासाठी पश्चिम रेल्वेने उघडलेल्या स्वतंत्र खिडक्यांवर आता फक्त सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत स्वत:च्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले असून ते यशस्वी झाले असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत आहे. आता उपनगरी मार्गावर असलेल्या १४८ तिकीट आरक्षण खिडक्यांपैकी सुमारे ४५ खिडक्या खास तत्काळसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. या खिडक्यांवर १० ते १०.३० या वेळेमध्ये प्रवाशांना तत्काळ तिकिटे काढता येतात. याच खिडक्यांवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून प्रवाशांना स्वत:ची तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. महिला प्रवाशांसाठी चर्चगेट, मरिन लाइन्स, अंधेरी आणि बोरिवली येथे आरक्षित तिकिटांसाठी स्वतंत्र खिडक्या पुढील महिन्यात उघडण्यात येणार आहेत.

Story img Loader