मुंबई : मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉकमुळे शुक्रवारी पहाटेपासून लोकल कल्लोळ सुरू झाला होता. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल सुमारे ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तसेच रस्त्यावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे प्रवाशांना जास्तच मनस्ताप सहन करावा लागला.

असह्य उकाड्याने घामाच्या धारा आणि कार्यालयात पोहोचण्यास झालेला विलंब यामुळे प्रवाशांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, ब्लॉकमुळे अनेक आस्थापनांनी कार्यालयाच्या वेळेत बदल केल्याने, तसेच अनेक कार्यालयांनी कार्यालयीन वेळा शिथिल करून, घरून काम करण्याची मुभा दिल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परिणामी, सकाळनंतर हळूहळू रेल्वे स्थानकांमधील गर्दी कमी झाली. परंतु त्याच वेळी अनेक प्रवासी रस्ते मार्गाने कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Jammu Kashmir Assembly Chaos
Chaos in J&K Assembly : जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आमदार भिडले; कलम ३७० च्या मुद्द्यावरून सभागृहात घमासान!
accused absconded from Ajani police station
नागपूर : आजनी पोलीस ठाण्यातून आरोपी पसार

हेही वाचा >>> सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेप्रवाशांची कसोटी; ‘महाब्लॉक’मुळे आज ५३४ फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेवरील ठाणे – कळवादरम्यान गुरुवारी रात्री १२.३० पासून रविवारी दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवारी सुमारे १६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर, काही लोकलच्या फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना सकाळच्या वेळी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि घरून कार्यालयीन काम करण्याची मुभा न मिळालेले कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी धडपडत होते. नेहमीच्या वेळेच्या आधीच ते रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यानंतर त्यांना त्यांची इच्छित लोकल मिळाली. मात्र, यावेळी ब्लॉकची कामे सुरू झाल्याने अनेक लोकल डोंबिवली, कल्याणदरम्यान एकामागोमाग एक अशा रांगेत उभ्या होत्या. या लोकल कल्लोळामुळे अनेकांनी रेल्वेकडे पाठ फिरवली.

टप्पा वाहतूक

मुंबई : मध्य रेल्वेवरील महा मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टप्पा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. २ जून रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असून या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या ही परवानगी असणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लॉक रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महामेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रविवारच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेने रविवारी, २ जून रोजी घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केला. शनिवारी आणि रविवारीही मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने या दिवशी प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

गर्डर बदलण्यासाठी काही गाड्या रद्द

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणा दरम्यान पूल क्रमांक ९० वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी १ जूनच्या मध्यरात्री १२.२० ते २ जून रोजी सकाळी ६.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.

२ जून रोजी रद्द झालेल्या गाड्या

● विरारहून पहाटे ५.३५ वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल

● डहाणू रोडवरून सकाळी ७.१० वाजता सुटणारी डहाणू रोड झ्र चर्चगेट लोकल

● वांद्रे टर्मिनस – भुसावळ एक्स्प्रेस – भुसावळ – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस

२ जून रोजी पहाटे ५.२५ वाजता डहाणू रोडवरून सुटणारी डहाणू रोड – पनवेल लोकल डहाणू रोड आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अंशत: रद्द आहे.

● वसई रोड आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल धावेल. तसेच काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात १५ ते ३० मिनिटांचा बदल करण्यात आला आह.