मुंबई : मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. प्रवाशांनी तिकिटांचे जादा पैसे मोजूनही त्यांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमध्ये शनिवारी सकाळी शेकडो प्रवासी अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. दादर स्थानकात लोकल आली असता, लोकल व्यवस्थापक (गार्ड) दरवाजे उघडायला विसरला. त्यामुळे प्रवासी लोकलमध्येच अडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकल शनिवारी सकाळी ८.३३ वाजता सुटली. ही लोकल सकाळी १०.०५ वाजता दादर स्थानकात पोहोचली. लोकल स्थानकात एक मिनिट थांबली. मात्र, दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून उतरता आले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दादर स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी उतरतात. मात्र लोकलचे दरवाजे बंद राहिल्याने प्रवाशांना उतरता आले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

लोकल पुढील परळ स्थानकात थांबल्यानंतर प्रवासी लोकलमधून उतरले. दरम्यान, गार्ड गोपाळ ढाके यांनी दादरमध्ये वातानुकूलित लोकलचा दरवाजा उघडला नाही. ज्यामुळे प्रवाशांना परळ स्थानकात उतरावे लागले. गोपाळ ढाके यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.