नोकरी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी पासपोर्ट म्हणजे अनिवार्य गोष्ट असते. पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदारांना अनेक दिव्यांतून पार पडावे लागण्याचा अनुभव काही नवीन नाही. गेल्या काही वर्षात ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहेत. आता, या दृष्टीने आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत वेळ कमी लागावा यासाठी, मुंबई पोलिसांनी ‘पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस’ ही नवी सुविधा सुरू केलीय. या सुविधेनुसार पासपोर्ट ऑफिसमधून ज्यावेळी तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये येईल, त्यावेळी तुम्हाला एसएमएस येईल. त्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनसाठीची तारीख आणि वेळ या एसएमएसमधून तुम्हाला कळवली जाईल. व्हेरिफिकेशन पूर्ण होताच तुमचा फॉर्म पासपोर्ट ऑफिसला कोणत्या तारखेला पाठवला गेला आणि किती वाजता हे सुद्धा एसएमएसमधून कळेल आणि हे सगळे ऑनलाईनसुद्धा चेक करता येणार आहे.

Story img Loader