मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये दररोज लाखो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. रुग्णालयातील विविध विभाग शोधताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सर्वत्र भटकावे लागते. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होतात. त्यामुळे वैद्यकीय सेवा-सुविधा, विविध विभाग, तसेच इतरही पूरक माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सोयीचे व्हावे यासाठी लोढा यांनी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष सुरू करण्याची सूचना महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा >>> गिरगावातील इमारत धोकादायक घोषित न करण्यासाठी दबाव? आयआयटीच्या अहवालाकडे काणाडोळा

मदत कक्षासाठी प्रामुख्याने रुग्णालयांचे प्रवेशद्वार किंवा नोंदणी कक्ष येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे रुग्णांना मदत करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रमुख रुग्णालयांमध्ये सकाळी ३, दुपारी २ व रात्री १ याप्रमाणे सत्रनिहाय कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी २ व दुपारी १ कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहे.

कसे असेल मदतकक्ष

मदत कक्षामध्ये लॅपटॉप अथवा संगणक व दूरध्वनीची सोय असेल. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित मदत देण्यासाठी आवश्यक कुशल कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेतही प्रभूत्व असेल, तसेच त्यांना संगणकीय ज्ञान असेल. त्यासोबतच, या कक्षामध्ये नोंदणी पुस्तिका त्याचप्रमाणे सूचना पेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient friend help desks in mumbai municipal corporation hospitals mumbai print news ysh
Show comments