मुंबई : केईएम रुग्णालयातील रुग्ण अहवालांच्या आवरणाचा (फोल्डर) वापर करून कागदी ताटल्या तयार केल्याचे उघडकीस आले. हे आवरण रद्दीत देण्याच्या प्रक्रियेवर योग्य देखरेख न ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे अशा विविध चाचण्या केल्यानंतर रुग्णांना अहवालासोबत कागदी आवरण (फोल्डर) देण्यात येते. अहवालांसाठी वापरण्यात आलेले कागदी आवरण कालबाह्य झाल्याने ते नष्ट करण्यासाठी रद्दीत दिले जाते. महानगरपालिकेने नेमलेल्या सेवा पुरवठादाराकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु संबंधित सेवा पुरवठादाराने या कालबाह्य झालेल्या आवरणांचे तुकडे न करताच विल्हेवाट लावण्यासाठी दिल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा…मेट्रो ३ साठी जायकाकडून मिळणार ४६५७ कोटीचे कर्ज, कर्जाच्या शेवटच्या टप्प्याच्या वितरणासाठी केंद्र आणि जायकामध्ये करार

सेवा पुरवठादाराने आवरणांचे तुकडे न करताच निष्काळजीपणाने ही रद्दी हाताळल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य देखरेख न केल्याने रुग्णालयातील संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासनाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमली असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.