मुंबई : मुंबई, पुणे, नागपूरसह मोठ्या शहरांमध्ये फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जवळपास संपुष्टात आली आहे. एवढेच नव्हे तर अनेक शहरांमध्ये आता घरी जाऊन तपासणी करणाऱ्या जनरल फिजिशियनची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. एमबीबीएस, होमिओपॅथी वा बिएएमएस डॉक्टरही शहरी भागात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णाकडून तपासणी व तीन दिवसांंच्या औषधासाठी किमान दोनशे ते चारशे रुपये आकारत आहेत. ग्रामीण भागातही जनरल फिजिशियनकडून शंभर रुपयांपेक्षा कमी घेतले जात नाहीत. अशावेळी छत्रपती संभाजीनगरमधील ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या माध्यमातून अवघ्या १० रुपयांमध्ये रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले जात आहेत. यातील विशेष बाब म्हणजे मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना अवघ्या ५० रुपयांमध्ये महिनाभराची औषधे संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. आजघडीला संभाजीनगर शहर, तसेच ग्रामीण भागातील १०५ गावातील अडीच लाख रुग्णांची वर्षाकाठी आरोग्य तपासणी केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा