संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आता २१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. या अगोदरही त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज पुन्हा एकदा सुनावणीसाठी पुढील तारीख देण्याता आली असून, पुढील सुनावणी ही २१ ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा : “एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख…; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर पलटवार!

मुंबई सत्रन्यायालयात आज संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. दोघांमध्ये काही मिनिटं चर्चा झाली. यावेळी खडसेंनी राऊतांची विचारपूस केल्याचे दिसून आले. यावर “सगळं ठीक आहे, चिंता नको लवकरच बाहेर येईल.” असं संजय राऊत खडसेंना म्हणाल्याचे समोर आले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस

शिवसेना खासदार संजय राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी करून राऊत यांना जामीन देण्यास विरोध केला.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका ; जामिनाला विरोध करताना ‘ईडी’चा दावा

गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह काही कंपन्यांचे प्रमुख असलेल्या प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां यांच्या खात्यात ३.२७ कोटी रुपये वळवले. या घोटाळय़ाशी संबंधित आणखी नवे पुरावेही हाती लागले असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचा दावाही ईडीतर्फे महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी विशेष न्यायालयासमोर केला.

Story img Loader