मुंबई : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता येथील श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते. मात्र, त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या मार्च महिन्यात या कामला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या ५६ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून लवकरच त्या बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्हॅनची वर्दळ सुरु असते. भविष्यात या मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत श्यामनगर तलावापर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्णही झाले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी तसेच मेट्रोच्या विकासकामामुळे श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते. मात्र, महानगरपालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर रखडलेले रस्ता रुंदीकरण पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या सांगतेला व्याकरणाची सुरुवात 

महापालिका लवकरच रुंदीकरणाचे काम हाती घेणार आहे. श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान रस्त्याची लांबी ८०० मीटर आहे. तेथे दक्षिण भागात ५६ बांधकामे, तर उत्तरेकडे ९६ बांधकामे बाधित होणार आहेत. सुरुवातील दक्षिण भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून त्यासाठी ५६ बांधकामांना (प्रकल्पबाधित) महापालिकेमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे. या कामाची अंतिम यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून ते येत्या २० दिवसांत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून दक्षिण भागाचे काम पूर्ण झाल्यावर उत्तर भागाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात उभारणार नवीन सर्पालय, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

पात्र असलेल्या बाधित बांधकामांना पर्यायी जागा देण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.