सरकारी बँकांतून मोठय़ा रकमेची कर्जे मिळवून देण्यात पटाईत असलेला पवन बन्सल हाच ‘भारतीय जीवन विमा महामंडळा’ला आतबट्टय़ाचा ठरलेल्या विशिष्ट कंपनीच्या समभाग खरेदी प्रकरणाचाही सूत्रधार असण्याची शक्यता आहे.
बन्सलने ‘एलआयसी’मधील एका विद्यमान कार्यकारी संचालकाशी संगनमत करून नुकसानीत गेलेल्या बांधकाम कंपनीचे समभाग खरेदी करावयास लावले. या व्यवहारात ‘एलआयसी’ला २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता ‘एलआयसी’ने संबंधित अतिवरिष्ठ अधिकारी आणि बन्सल यांच्या संबंधाबाबत अंतर्गत चौकशीचेही आदेश दिले आहेत.
सिंिडकेट बँकेचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए. के. जैन यांच्या लाच प्रकरणात अटक झालेला पवन बन्सल याचे सरकारी उपक्रमातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले लागेबांधे आता समोर येत आहेत. केंद्रीय गुप्तचर विभागानेही (सीबीआय) बन्सलच्या विविध बडय़ा सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या साटेलोटय़ाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. युको, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेतून दिल्या गेलेल्या मोठय़ा रकमेच्या कर्जामागेही बन्सल असल्याने ही माहितीही तपासण्यास सुरुवात केली आहे.
मोठय़ा प्रमाणात लाचेच्या रकमेचे वितरण करण्यामागेही बन्सलच असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये ‘एलआयसी’ने ‘वेलस्पून गुजरात’ आणि ‘अॅम्टेक अॅटो’ या कंपनीच्या समभागांमध्ये तब्बल ३५० कोटी गुंतविले होते.
यामागे बन्सलच असावा, असा दाट संशय आहे. या समभागांपोटी बन्सलच्या ‘अल्टिअस फिनसव्र्ह प्रा. लि.’ या कंपनीला मोठय़ा प्रमाणात रक्कम मिळाली.
त्यापैकी काही रक्कम लाचेच्या स्वरूपात बडय़ा अधिकाऱ्यांना त्याने वाटली असावी. यापोटी एलआयसीला मात्र २०० कोटींचे नुकसान झाले होते. त्या व्यवहारात सक्रिय असलेला बडा अधिकारीच ‘एलआयसी’चा कार्यकारी संचालक असल्याचेही या सूत्रांनी या वेळी स्पष्ट केले.
एलआयसीला खड्डय़ात ढकलण्यामागेही बन्सलच!
सरकारी बँकांतून मोठय़ा रकमेची कर्जे मिळवून देण्यात पटाईत असलेला पवन बन्सल हाच ‘भारतीय जीवन विमा महामंडळा’ला आतबट्टय़ाचा ठरलेल्या विशिष्ट कंपनीच्या समभाग खरेदी प्रकरणाचाही सूत्रधार असण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2014 at 03:44 IST
TOPICSपवन बन्सल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan bansal behind lic los