बेस्टच्या वीजग्राहकांना आता मोबाइलवरून वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. ७ ऑगस्ट या बेस्ट दिनानिमित्त सुरू होणाऱ्या या योजनेचा लाभ मोबाइल वॉलेट तंत्राच्या माध्यमातून घेता येईल.
महानगर गॅस, एमटीएनएल तसेच रिलायन्ससाठी काम करणाऱ्या ‘मेसर्स माय मोबाइल पेमेंट्स लिमिटेड’ या कंपनीकडे या सेवेचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीच्या http://money-on-mobile.co m(एचटीटीपी मनी-ऑन-मोबाइल डॉट कॉम) या संकेतस्थळावर जाऊन वीजग्राहक स्वतच्या खात्यातून नेट बँकिंगद्वारे किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधून मोबाइल व्ॉलेट खरेदी करू शकतो.
कंपनीच्या अधिकृत आउटलेटमधून रोख रक्कम देऊनही व्ॉलेट घेता येईल. त्यानंतर एसएमएस पाठवून वीजबील भरता येईल. माय मोबाइलच्या वेबसाइटवर शहरातील आउटलेटची माहिती उपलब्ध आहे तसेच ६१२०१५०० या क्रमांकावर ती मिळू शकेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा