पाणीपट्टी व मालमत्ता करासह सर्व प्रकारच्या महसुलाचा भरणा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. शनिवार, रविवारसह गुढीपाडव्याच्या सुटीच्या दिवशीही भरणा केंद्रे सुरूच राहतील. महसूल संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २५ ते २८ मार्चदरम्यान केंद्र सकाळी नऊ ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत खुली असतील. 

शनिवारी सकाळी नऊ ते रात्री आठ, रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केंद्रात पाणीपट्टी, मालमत्ता कर भरता येणार आहे. गुढीपाडव्यादिवशीही सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत नागरी सुविधा केंद्र सुरू राहील.

 

Story img Loader