शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द परिसरात शुक्रवारी रात्री एका आज्ञात वाहनाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मानखुर्द पोलिसांनी आज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला ५० लाखांच्या लाचप्रकरणी अटक

मानखुर्द टी जंक्शन परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मानखुर्दवरून नवी मुंबईच्या दिशेने अज्ञात वाहने भरधाव वेगात जात असताना त्याने पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमी इसमाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरू केला आहे.