मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाने दादरमधील प्लाझा चित्रपटगृहालगतच्या पदपथावर स्वच्छता मोहीम राबविली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा या पदपथावर भाज्यांच्या कचऱ्याचा खच पडला आणि मातीमुळे पादचाऱ्यांना चिखल तुडवत वाट काढावी लागली. त्यामुळे जी उत्तर विभागामधील घन कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी येथील भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. एका दिवसात कारवाईदरम्यान २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच पदपथ अस्वच्छ करणाऱ्या भाजीविक्रेत्यां समज देण्यात आली.

दादर पश्चिम परिसरात लोकमान्य टिळक पूल जिथे उतरतो तिथे कोतवाल उद्यानाच्या आजूबाजूला आणि प्लाझा चित्रपटगृहालगतच्या पदपथावर दररोज भाज्यांचा कचरा, भाज्यांच्या मुळांना लागलेली माती पडलेली असते. दादरच्या बाजारातील भाजी विक्रेते रोज सकाळी बाहेरगावाहून येणाऱ्या भाज्या इथे उतरवून घेतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याला व अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाने दोनच दिवसांपूर्वी एक मोहीम हाती घेतली होती. त्यात भाजी विक्रेत्यांनाही समाविष्ट करून घेतले होते. तसेच त्यांना स्वच्छतेविषयी जाणीव व जागरूक करण्याची अनोखी मोहीम राबविण्यात आली होती.

Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pune Pigeon grain, Pune Pigeon,
पुणे : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !
Sewage channel cover Pune, Pune roads,
झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !
Municipal Corporations encroachment removal department conducted campaign on Main Road, Shalimar market area
रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम मेनरोड, शालिमार भागात कारवाई
Anti encroachment squad of Kulgaon Badlapur Municipal Council took action against hawkers in the eastern part of Badlapur
अतिक्रमण कारवाईत दुजाभाव ?
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
deportation action against criminals is on paper only
पुणे : तडीपारीची कारवाई कागदावरच; तडीपार गुन्हेगारांचा सर्रासपणे शहरात वावर

हेही वाचा… आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ‘वॉर रूम’ कागदावरच!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने सध्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जी उत्तर विभागाने दादरच्या प्लाझा परिसरात एक मोठी मोहीम हाती घेतली होती.

दादर स्थानक परिसर भाजी आणि फूल विक्रेत्यांसाठी मोठा बाजार आहे. रोज पहाटे या ठिकाणी मुंबईच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर घाऊक प्रमाणावर भाज्या आणि फूले आणली जातात. लहान व्यापारी ते विकत घेतात आणि ठिकठिकाणी नेऊन विकतात. भाज्यांच्या उतरवताना होणारा कचरा, माती यामुळे स्थानकाजवळचे रस्ते विशेषतः प्लाझा येथे टिळक पुलाच्या पदपथावर जाड चिखलाचे थर साठतात. अनेक वेळा पादचारी यावरून घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून पालिकेने आतापर्यंत तेथे अनेकदा स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच कचरा, चिखल साचतो. त्यामुळे सोमवारी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा ही मोहीम हाती घेतली होती.

हेही वाचा… कागदपत्र जमा करणाऱ्या गिरणी कामगारांची संख्या लाखापार; आतापर्यंत ८० हजार कामगार पात्र

आपण भाजी उतरवताना त्याखाली ताडपत्री ठेवावी, गोणी अंथरावी म्हणजे रस्त्यावर चिखल होणार नाही अशा सूचनाही भाजी विक्रेत्यांना करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा भाजी विक्रेत्यांनी आपल्या नेहमीच्याच पद्धतीने गोणी उतरवल्या व रस्त्यावर कचरा केला. गोण्या किंवा ताडपत्री न अंथरल्यामुळे व कचरा केल्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. तसेच दादर परिसरात कचरा करणाऱ्या अन्य व्यापारी व विक्रेत्यांनाही दंड करण्यात आला. दिवसभरात २३ विक्रेत्यांना दंड करण्यात आला. त्यांच्याकडून दंडाच्या रुपात २६ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागातील अधिकारी इरफान काझी यांनी दिली.

Story img Loader