रंगपंचमीच्या निमित्ताने सभा घेऊन त्यात आपल्या भक्तांवर पाण्याची बरसात करून अपव्यय करणाऱ्या आसाराम बापूंना थांबवा, अशी विनंती नवी मुंबई येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांने सोमवारी उच्च न्यायालयाकडे केली. मात्र त्याने त्यासाठी जनहित याचिका करावी व त्यानंतर त्यावर सुनावणी घेतली जाईल, असे निर्देश न्यायालयाने दिले.
रंगपंचमीनिमित्त आसाराम बापू नवी मुंबईत भक्तांवर पाण्याची बरसात करणार होते. परंतु एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आसाराम बापूंतर्फे मात्र राज्यभर पाण्याचा अपव्यय करणारी रंगपंचमी साजरी केली जात असल्याचा आरोप केला. नवी मुंबईतील रहिवाशी विष्णू गवळी यांनी एका अर्जाद्वारे मुख्य न्या. मोहित शहा आणि न्या. अनूप मोहता यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज केला आणि परिस्थिती विशद केली. मात्र याबाबत प्रक्रियेनुसार जनहित याचिका करण्याचे निर्देश न्यायालयाने गवळी यांना दिले. न्यायालयानेो अर्जाची स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेण्याची विनंतीही गवळी यांनी न्यायालयाकडे केली.
नागपूर येथेही आसाराम बापू यांनी पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी अर्जात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा