मुंबई : येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी गुंतवणुकीचा भविष्यपट मांडणारा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ लवकरच सादर होत आहे. खर्च व उत्पन्नाचे गणित जुळवून कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची घडी बसवून देणाऱ्या या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनाचे यंदाचे हे सलग १२ वे वर्ष आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही दिवसांतच, नवीन आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणारा ‘गुंतवणूक-संकल्प’ म्हणून ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे आजवर नेहमीच स्वागत होत आले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदी आणि बदलती बाजार स्थिती यातून गुंतवणुकीला आवश्यक ठरणारे नवीन वळण आणि त्याबद्दलचे परिपूर्ण मार्गदर्शन हे यंदाच्या अंकाचेही वैशिष्ट्य आहे. अनुभवी गुंतवणूकतज्ज्ञांचे अंकातील वेगवेगळ्या विषयांचे विवेचन करणारे लेख म्हणजे वाचकांसाठी गुंतवणूक समृद्धीच ठरत आली आहे. शेअर बाजाराचा ताजा कल भीतीदायी आहे. म्हणूनच २०२५ सालातील पुढचा काळ हा गुंतवणूकदारांसाठी आणखी तापदायी असेल, की दिलासादायी क्षण समीप आहेत? एफडी-आरडी, कमोडिटीज, सोने-चांदी, क्रिप्टो, जमीन-जुमला, बाँड्स वगैरेतून पैशाला मोठे बनविणारा कमी जोखमीचा मार्ग निवडायचा तर तो कोणता, या प्रश्नांच्या उत्तरासह, गुंतवणुकीचे वार्षिक अवलोकन म्हणूनही यंदाचा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा अंक निश्चितच मार्गदर्शक ठरेल. शिवाय गुंतवणुकीतून जे कमावले त्या संपत्तीचे स्वकियांमध्ये विनासायास, विना-तंटा हस्तांतरण व्हावे यासाठी करावे लागणारे ‘इच्छापत्र’ (विल) आणि त्या अंगाने सर्व शंका-कुशंकांचा उलगडा देखील या अंकाचा एक भाग आहे. नोकरी-व्यवसायात स्थिरता पूर्वी ज्या वयात येत असे आता त्या ४०-४५ वर्षे वयात निवृत्ती स्वीकारण्याचे स्वप्न पाहणारे आज बरेच आहेत. स्व-मालकीचे घर घेण्यासाठी वयाची पन्नाशी ओलांडावी लागण्याचे दिवसही सरले आहेत. अशा मंडळींना अनुसरायचे नियोजन यापासून ते साठीनंतर सुरू होणारी ‘दुसरी इनिंग’ यासाठी करावयाची गुंतवणुकीची आखणी देखील ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’मधून सुलभ होईल.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड

● सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी लिमिटेड

● पॉवर्ड बाय : नेमिनाथ ज्वेलर्स आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

Story img Loader