नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात नवीन कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याच्या ४२९ कोटी ७८ लाख रुपयांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मान्यता दिली.
नागपूर आणि लगतच्या जिल्ह्यातील तसेच मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. याचा भाग म्हणून व्यापक उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितल़े

Story img Loader