उल्हासनगरात विकासकांना रान मोकळे
उल्हासनगरात बंद पडलेल्या उद्योगांच्या जागेचा रहिवास वा वाणिज्य वापर करण्यावरील बंदी राज्य सरकारने उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागी टॉवर उभारण्यास विकासकांना रान मोकळे झाले आहे.
नागरी क्षेत्रातील औद्योगिक वापर कमी करण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारने अनेक पालिका व शहरांच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून औद्योगिक विभागातील जमिनीवर, एकाद्या ठिकाणचा उद्योग बंद पडल्यास वा स्थलांतर झाल्यास त्या जागेचा वापर रहिवास वा वाणिज्य वापरासाठी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र उल्हासनगर शहरासाठी आजवर ही सवलत नव्हती. शहराचे वाढते नागरीकरण आणि मोठय़ा प्रमाणात बंद पडणारे उद्योग लक्षात घेऊन अन्य शहरांप्रमाणे औद्योगिक जागेचा निवासीकरणासाठी वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला पाठविला होता. त्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीतही बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएने उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर व परिसरासाठी लागू केलेल्या प्रारूप विकास नियंत्रण नियंत्रण नियमावलीत काहीही तरतूद असली तरी तेथे औद्योगिक जागेचा वापर निवासी, वाणिज्य कारणासाठी करण्यास मुभा राहील, असेही या आदेशात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा