मुंबई : पंजाब नॅशनल बँकेशी (पीएनबी) संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी हिरेव्यापारी नीरव मोदी याच्या देश-विदेशातील ५०० कोटी रुपयांच्या एकूण ३९ मालमत्ता जप्त करण्यास विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) परवानगी दिली. या मालमत्तेत दक्षिण मुंबईतील रिदम हाऊसचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

मोदी याच्या अलिबाग बंगल्यातील मौल्यवान वस्तू, २२ कार तसेच देश-विदेशात तपासादरम्यान जप्त केलेली मालमत्ता आणि बँक खात्यातील पैसे यांचा समावेश आहे. या मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) विशेष न्यायालयात करण्यात आली होती.

नीरव मोदी याची मालमत्ता जप्त करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी देण्याची ही दुसरी वेळ आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत आरोपीला फरारी घोषित करण्यात आल्यानंतर त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणी तपास यंत्रणेतर्फे केली जाते. त्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज करावा लागतो.

Story img Loader