आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याचा याचा फायदा भारताला झाला आहे. पेट्रोल- डिझेलच्या उत्पादनावरील खर्च कमी झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून कपात सुरु आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल ४२ पैशांनी स्वस्त होऊन प्रति लिटर ७९.६२ रूपये आहे. सहा आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये १२ रुपयांनी तर डिझेलच्या दरांत १३.६४ रूपयांनी कपात झाली आहे. एकवेळ पेट्रोलच्या किंमतीने ९० चा आकडा पार केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल व डिझेलच्या दरांत येत्या काही दिवसांत आणखी कपात होण्याची शक्यता आहे. तसेच, ही कपात पुढील काही दिवस कायम राहाण्याचेही संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरांत होणारी घसरण कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाला असून इंधन आयातीच्या खर्चात लक्षणीय कपात होणार आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचे दर (प्रतिलिटरनुसार)

पुणे
पेट्रोल – ७९.५६ रुपये
डिझेल – ७०. ९४ रुपये

नागपूर
पेट्रोल – 79. 62 रुपये
डिझेल – ७1. 03 रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८०. ८१ रुपये
डिझेल – ७३. ३३ रुपये

नाशिक
पेट्रोल – ८०. १८ रुपये
डिझेल – ७१. ५४ रुपये

कोल्हापूर
पेट्रोल – ८०. ०१ रुपये
डिझेल – ७१. ०४ रुपये