औषध विक्री दुकानांवर पूर्णवेळ फार्मासिस्ट नेमला गेला पाहिजे, या मागणीसाठी राज्यभरातील फार्मासिस्ट २९ जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
‘अन्न व औषध प्रशासना’च्या नियमानुसार औषध विक्री दुकांनांमध्ये फार्मासिस्ट नेमणे बंधनकारक आहे. पण, फार्मासिस्टला जास्त पगार द्यावा लागेल म्हणून कित्येक दुकानदार हा नियम धाब्यावर बसवितात. दुसरीकडे राज्यात हजारो फार्मासिस्ट बेरोजगार आहेत. त्यामुळे, प्रत्येक औषधाच्या दुकानात फार्मासिस्टची नेमणूक केली गेली पाहिजे, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र फार्मासिस्ट वेल्फेअर असोसिएशन’ च्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.
फार्मासिस्टनी संघटनेच्या झेंडय़ाखाली एकत्र येऊन आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उंचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.