मुंबईः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता असल्याचा दूरध्वनी महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्या बाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : न्हावा शेवा बंदरावरून १० कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त, डीआरआयची कारवाई

Reserve Bank,
“मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
21 threats at Mumbai airport , Mumbai airport,
मुंबई विमानतळावर दीड महिन्यात २१ धमक्या

महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने दूरध्वनी केला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो मुंबईहून गुजरातला जाताना रेल्वेमध्ये चार ते पाच मुस्लिम व्यक्तींना उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ऐकले. हे मुस्लिम प्रवासी उर्दू भाषेत बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे. त्यांनी सांगितले की, हे सर्वजण मुंबईतील मोहम्मद अली रोडवर भाडे तत्त्वावर राहणार आहेत. यावेळी ठाकरे यांच्या घराबाहेर घटना घडणार असल्याचेही त्यांच्यात चर्चा झाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाने तात्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली.

त्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाला याबाबतची तात्काळ माहिती देण्यात आली. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासणीत या दूरध्वनीतील माहितीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. तसेच दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली असून तो संबंधीत रेल्वेमध्ये त्यावेळी उपस्थित नसल्याचे समजले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> लालबाग येथील शाळेच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळेना

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे दीडशेहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले होते. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.