मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याच्या आरोपाप्रकरणी २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला. या प्रकरणी २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

मार्च २०२१ मध्ये फडणवीस यांनी  विरोधी पक्षनेते असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पोलीस खात्यातील बदल्यांमध्ये कथित भ्रष्टाचाराबाबत लिहिलेल्या पत्राचा हवाला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. या पत्रात, अभिवेक्षण केलेल्या दूरध्वनींचा तपशीलही होता. या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी त्यांचे बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण केल्याचा आरोप केला होता.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण आणि गोपनीय कागदपत्रे उघड केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. राज्य गुप्तचर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण केल्याचा आरोप आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. नंतर, सीबीआयने प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. राज्य गुप्तचर विभागानेही या प्रकरणाचा तपास बंद करण्यास आक्षेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी सीबीआयचा अहवाल मान्य करून प्रकरणाला पूर्णविराम दिला.