डॉलरच्या तुलनेत झालेल्या रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोलच्या दरांत भाववाढ होऊन २४ तासही उलटले नसताना आता ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ (स्वयंपाकासाठीचा) घरगुती पाइप गॅसच्या दरांचा भडका उडाला आहे. या दोन्ही गॅसच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही वाढ रविवारी मध्यरात्रीपासून अमलात आली आहे. या दरवाढीमुळे रिक्षा किंवा टॅक्सीच्या भाडय़ात तातडीने वाढ होणार नसली तरी भविष्यात ही भाडेवाढ अटळ आहे.
घरगुती पाइप गॅससाठी मुंबईकरांना आता प्रतिकिलो २४ रुपये ९ पैसे मोजावे लागणार असून ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये हाच दर २४ रुपये १७ पैसे असेल. या दरवाढीमुळे सीएनजीसाठी मुंबईत प्रतिकिलो ३५ रुपये ९५ पैसे मोजावे लागणार आहेत. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये हा दर अनुक्रमे ३६ रुपये ४७ पैसे व ३६ रुपये ३० पैसे असा राहणार आहे.
‘सीएनजी’चे अन्य उपनगरातील दर
मीरा रोड-भाईंदर- ३६ रुपये १७ पैसे, अंबरनाथ- ३५ रुपये ९५ पैसे, तळोजा-३५ रुपये ९५ पैसे, भिवंडी- ३६ रुपये ३० पैसे, खारघर-३५ रुपये ९५ पैसे, पनवेल-३५ रुपये ९५ पैसे
पाइप गॅसचे अन्य शहरातील दर
मीरा रोड-भाईंदर- २४ रुपये २८ पैसे, अंबरनाथ-२४ रुपये ९ पैसे, तळोजा- २४ रुपये ९ पैसे, भिवंडी-२४ रुपये ४० पैसे, खारघर- २४ रुपये ९ पैसे, पनवेल- २४ रुपये ९ पैसे.

Story img Loader