गिरगाव चौपाटीसमोर ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने मरिन ड्राइव्हच्या दोन्ही बाजूकडील रस्ता पाच फुटापर्यंत खचला आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लाखो लिटर पाणी वाया गेल्याने दक्षिण मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नरिमन पॉइंटकडील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या ब्रिटीशकालीन जलवाहिनीची जाडी तब्बल ३२ इंच एवढी होती.

Story img Loader