मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आणण्यासाठी राजस्थानला गेलेल्या राम कनोजिया याच्या राहत्या घरातून पोलिसांनी पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी भाडेतत्त्वावर या घरात राहत होता. दरम्यान, याप्रकरणातील न्यायालयाने नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीत २६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व परिसरातील निर्मल नगर येथील आमदार, मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकणातील अटक आरोपी नऊ जणांमध्ये गुरमेल बलजित सिंह (२३), धर्मराज कश्यप (२१), हरीशकुमार निषाद (२६), प्रवीण लोणकर (३०), नितीन गौतम सप्रे (३२), संभाजी किसन पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७), चेतन दिलीप पारधी आणि राम फुलचंद कनोजिया (४३) यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी आरोपी राम कनोजिया हा पनवेल येथील पळस्पे फाट्याजवळ भाडेतत्त्वाने घर घेऊन राहत होता. त्याच्या घरातून पोलिसांनी पिस्तुल व तीन जीवंत काडतुसे जप्त केले आहेत. अटक आरोपी भगवत सिंह व राम कनोजिया हे दोघेही उदयपूर येथे जुलै महिन्यात गेले होते. तेथून आरोपींनी दोन परदेशी बनवटीच्या पिस्तुल आणल्या होत्या. त्यांचा वापर सिद्दीकी यांच्या हत्येसाठी करण्यात आला होता.

Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vileparle DP road connecting SV Road and St Francis Road has not been built since 2015
ही तर न्यायव्यवस्थेची थट्टाच, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेवर ताशेरे, नऊ वर्ष निव्वळ आश्वासने, डीपी रस्ता मात्र कागदावरच
Assistant Commissioners, Public Service Commission,
लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका
Violation of traffic rules Mumbai, rickshaw drivers Mumbai,
मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा
Baba Siddique Shot dead
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणः आणखी एका आरोपीला अटक
admission process for undergraduate and postgraduate pharmacology courses adjourned
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्थगित, महाविद्यालये, विद्यार्थी पालक अडचणीत
Cold Play, Diljit Concert, ticket black market case,
‘कोल्ड प्ले’, ‘दिलजीत कॉन्सर्ट’ तिकीट काळाबाजार प्रकरण : ‘ईडी’चे देशभरात १३ ठिकाणी छापे

हेही वाचा – संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल

हेही वाचा – मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा

सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. तसेच सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारा शिव कुमार ऊर्फ शिवा गौतम याच्यासह आरोपींना मदत करणारा मोहम्मद झिशान अख्तर व कटात सहभागी शुभम लोणकर यांचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. दरम्यान, अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. अटक आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधारकार्ड जप्त करण्यात आली होती.

Story img Loader