कसाबला फाशी का दिली? आता माझे आठ अतिरेकी विमानाचे अपहरण करून प्रवाशांना ठार मारतील, अशी धमकी विमान कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकावर दोन-तीनदा देणाऱ्या विकास यादव या १९ वर्षे वयाच्या तरुणाला अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटने दोन महिन्यांच्या सलग तपासानंतर अटक केली. कसाबने चार तासांत अनेक माणसे मारल्याने आपण प्रभावित झालो, असे सांगणाऱ्या विकास यादवने वर्षभरात धमक्या देणारे पाच-सहा दूरध्वनी केल्याचे स्पष्ट झाले आह़े
कसाबच्या सुटकेसाठी २२ ऑक्टोबर २०१२ रोजी जेट एअरवेजच्या मुंबई-बंगळुरू या विमानाचे काही अतिरेकी अपहरण करणार असल्याचा दूरध्वनी आला होता. त्यानंतर कसाबला फाशी दिल्यानंतरही असा दूरध्वनी आला होता. पोलीस आयुक्तांनी हा तपास अंधेरी युनिटकडे सोपविला होता.

Story img Loader