जनुकीय चाचण्यांच्या अहवालाच्या आधारे पालिकेची आखणी

इंद्रायणी नार्वेकर
मुंबई :  मुंबईतील करोना रुग्णांच्या जनुकीय चाचण्यांमध्ये डेल्टाचे १२८ रुग्ण आढळल्यानंतर पालिके ने आता या माहितीच्या आधारे पुढील नियोजन करण्याचे ठरवले आहे. विषाणूचा नवा प्रकार मुंबईत पसरला असण्याची शक्यता गृहीत धरून या रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यात येणार आहे.

सध्या पालिके ने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक लाख रुग्णशय्यांची तयारी ठेवली आहे. मात्र डेल्टामुळे रुग्ण बरे होण्याचा कालावधी वाढत असल्यास मात्र रुग्णशय्या आणखी वाढवण्याची गरज भासू शकते, अशीही शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त के ली आहे.

करोना विषाणूच्या  जनुकीय रचनांमधील बदल शोधण्यासाठी पालिके च्या मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील जनुकीय प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १९२ नमुन्यांमध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील करोना विषाणूने बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुंबईत डेल्टा विषाणू पसरला असण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून पालिके च्या आरोग्य विभागाने आता या रुग्णांचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. कस्तुरबा रुग्णालयातील या जनुकीय प्रयोगशाळेत एकाच वेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष समोर येतात. ऑगस्टमध्ये दैनंदिन करोनाबाधितांची  संख्या घटू लागल्याने साधारण १९२ नमुने गोळा झाल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. मात्र या कालावधीत या १२८ डेल्टा रुग्णांपैकी अनेक बरे होऊन घरी गेले तर मोजके  रुग्ण दगावले. या सर्व रुग्णांचा अभ्यास करण्यात येत आहे.

‘या १२८ रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या के ल्या जातील,’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी  दिली. ‘प्रत्येक रुग्ण रुग्णालयात कधी दाखल झाला, किती दिवस घरी होता, किती दिवसांनी रुग्णालयातून घरी गेला, त्याला काही अन्य आजार होते का याचा संपूर्ण अभ्यास के ला जाणार आहे. त्यामुळे डेल्टाचा विषाणू नक्की कसा वागतो,त्याला किती दिवसांच्या उपचारांची गरज आहे हे समजू शकेल,’ असे ते म्हणाले.

‘लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करा’

  • करोनाची लक्षणे दिसल्यास किं वा करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने के ले आहे.
  •  निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
  • करोना विषाणूचा नवा प्रकार असलेला डेल्टा विषाणू आधीच भारतासह ११ देशांमध्ये पसरलेला आहे.  त्यामुळे वेळीच चाचणी करून निदान के ल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते, असे पालिकेने म्हटले आहे.
  •   पालिकेने दवाखाने, विभाग कार्यालये, प्रसूतिगृहे या ठिकाणी आरटीपीसीआर व प्रतिजन चाचण्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत अशा २५० ठिकाणी चाचण्या के ल्या जात आहेत.
  • नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.

‘क्वारंटाइन’ कालावधी वाढणार?

आतापर्यंत करोना विषाणूचा संसर्ग झाला तर बहुतांशी रुग्ण साधारण १४ दिवसांनंतर बरे होत असत.  करोना उपचार के ंद्रात दाखल असलेल्या रुग्णांनाही १४ दिवसांनंतर घरी पाठवले जात असे. मात्र डेल्टा रुग्णांना बरे होण्यासाठी अधिक कालावधी लागतो आहे का की कमी कालावधी लागतो, याचाही मुख्यत्वे अभ्यास केला.

Story img Loader