मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पीओपी मूर्ती बंदीला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना पर्यावरण पूरकमूर्ती बाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. तसेच घरगुती गणेशमूर्तीही यंदा पर्यावरणपूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. बंदी घालून चार वर्षे झाली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांना पीओपीच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरल्यावरून उच्च न्यायालयाने महापालिका, राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरे ओढले होते. यंदा मात्र माघी गणेशोत्सवापासून या निर्णयाचा श्रीगणेशा होणार आहे.

यंदा १ फेब्रुवारीला माघी गणेशजयंती आहे. गेल्या काही वर्षांपासून माघी गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळे गणेशमूर्ती स्थापन करतात. मात्र यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक करण्यासाठी पालिकेने यावेळी प्लॅस्टर ऑप पॅरिसच्या मूर्तींना १०० टक्के बंदी राहणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत पालिकेने सोमवारी नियमांचे परिपत्रकच जारी केले आहे. त्यामुळे पीओपी पासून बनवलेली मूर्ती स्थापन करणार नाही असे हमीपत्र मंडळांना पालिकेकडे सादर करावे लागणार आहे.

हेही वाचा – १५ दिवसांत पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धूळीबाबत कार्यवाही करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षाचे आदेश

रस्त्यावर व पदपथांवर मंडप उभारून साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मंडप परवानगीसाठी प्रशाकीय विभाग कार्यालयातील संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांकरिता मार्गदर्शक सूचना, नियम लागू करण्यात आले आहेत. माघी गणेशोत्सवासाठी एकखिडकी पद्धतीने ऑफलाइन परवानगी देण्यात येणार आहे. तसेच मंडळांकडून उत्सवासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने येणाऱ्या अर्जांची विभाग कार्यालयाकडून छाननी करून वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे.

हेही वाचा – वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा

घरगुती मूर्तीही पर्यावरणपूरकच असाव्यात

मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका प्रलंबित असून ऑगस्ट २०२४च्या सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक मंडळांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आहे. यानुसार प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे स्थापना करणार नाही, या अटीचे पालन करावे. शिवाय घरगुती गणेशमूर्ती पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या असाव्यात. तसेच त्यांचे विसर्जन स्वत:च्या घरात, गृहसंकुल आवारात किंवा कृत्रीम तलावात करावे, असेही पालिकेने आदेश दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plaster of paris idols banned in maghi ganesh utsav household idols should also be eco friendly mumbai print news ssb