लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईतील रेल्वे स्थानके, बाजारपेठा आदी ठिकाणी प्रचंड गर्दी होते, तसेच सुट्टीचे निमित्त साधून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईत येतात. ही संधी साधून मुंबईतील टॅक्सीचालक पर्यटक, प्रवाशांची लूट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. टॅक्सी मीटरनुसार साधारण ३० ते ४० रुपये भाडे होत असलेल्या प्रवासासाठी टॅक्सीचालक प्रवाशांकडून थेट ८० ते १२० रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
Ulhasnagar drink and drive case
कल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले उल्हासनगरच्या २६ विद्यार्थ्यांचे प्राण, मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई
Locals Saved Me Foreigner Argues With Delhi Rickshaw Puller Over Fare
Video : ‘या लोकांमुळे भारतीयांचे नाव खराब होते’, पर्यटकाला लुटण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न; ‘१५०० रुपये दे’ म्हणत परदेशी व्यक्तीच्या मागेच लागला शेवटी…
Nagpur Winter Session Anil Parab, kalyan Marathi Family case , Anil Parab,
‘मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, सभागृहात काय घडले…

उपनगरीय लोकलने प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी अनेक जण टॅक्सीचा वापर करतात. मात्र रेल्वे स्थानकापासून जवळच्या ठिकाणी जाण्यास टॅक्सीचालक त्वरित नकार देतात. तर काही टॅक्सीचालक मीटरऐवजी थेट भाडे सांगतात. हे भाडे मीटरभाड्यापेक्षा अव्वाच्या सव्वा असल्याने प्रवाशांची लूट होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात टॅक्सीचालकांनी रस्तेच अडवून ठेवले आहेत. दिवाळीनिमित्त काही टॅक्सीचालकांच्या गटाने आरटीओ, वाहतूक पोलिसांची भिती न बाळगता वाट्टेल तिथे टॅक्सी उभ्या करून भाडे मिळविण्यास सुरुवात केली आहे. सीएसएमटी – गेटवे ऑफ इंडियादरम्यान मीटर टॅक्सीने गेल्यास साधारण ३० ते ४० रुपये होतात. तसेच टॅक्सीने ‘शेअरिंग’ प्रवास केल्यास प्रतिप्रवासी ४० रुपये घेण्यात येतात. मात्र, प्रवाशाने मीटरने जाण्याची विनंती केल्यास टॅक्सीचालक त्यास नकार देतात. यामुळे अनेक वेळा प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. टॅक्सीचालक जादा भाडे आकारणी करीत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

आणखी वाचा-राज्यात ८२३ नव्या प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर

चालक प्रामाणिक असून, ते प्रवाशांची लूट करीत नाहीत. मात्र काही वाहतूक पोलीसच टॅक्सीचालकांकडून विनाकारण पैसे घेतात. त्यामुळे काही ठिकाणी टॅक्सीचालक जादा भाडे आकारणी करतात. -ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

मुंबईतील चारही आरटीओकडून दोषी टॅक्सी आणि रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात येते. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी गैरवर्तन केल्यास, जादा भाडे आकारल्यास किंवा भाडे नाकारल्यास, प्रवासी आरटीओच्या मदतवाहिनी क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण केले जाते, असे मोटार वाहन विभागाचे प्रवक्ते विनय अहिरे यांनी सांगितले.

या मदत वाहिनीवर प्रवासी तक्रार करू शकतात

  • मुंबई मध्य (ताडदेव आरटीओ) – ९०७६२ ०१०१०
  • मुंबई पूर्व (वडाळा आरटीओ) – ९१५२२ ४०३०३
  • मुंबई पश्चिम (अंधेरी आरटीओ ) – ९९२०२ ४०२०२
  • बोरिवली आरटीओ – ८५९१९ ४४७४७

Story img Loader