घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाबद्दलची माहिती देण्यात आली. यापूर्वी राज्य सरकारने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घाटकोपरमधील एलबीएस रोडजवळील दामोदर पार्क येथील साईदर्शन इमारत मंगळवारी सकाळी कोसळली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले होते. यानंतर तातडीने मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर रुग्णालय होते. या रुग्णालयाचे नूतनीकरण करताना इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लावण्यात आला. या प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील शितपविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळमजल्यावरील रुग्णालयाच्या रचनेत फेरबदल केल्याचा आरोप सुनील शितपवर आहे. संबंधित रुग्णालय हे शितपच्याच मालकीचे आहे. साईदर्शन इमारत ४० वर्षे जुनी होती. इमारत जुनी झाल्याने आणि इमारतीच्या तळमजल्यावर मनमानी बदल करण्यात आल्याने या इमारतीचा पाया डळमळीत झाला होता. या इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर कोणीच राहात नव्हते. तर वरच्या तीन मजल्यांवर नऊ कुटुंबे वास्तव्यास होती. संपूर्ण तळमजल्यावर दीड वर्षांपूर्वी रुग्णालय होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते बंद होते. मागील दोन ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरु होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापौर महाडेश्वर यांनी दिला आहे. दरम्यान, ही इमारतच अनधिकृत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.