मुंबई: केंद्राच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता भारतीय रेल्वेमधील विविध विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’साठी उभारण्यात आले आहेत. याद्वारे ‘डिजिटल इंडिया’, ‘स्कील इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ अशा विविध योजनांची जाहिरात करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील महत्त्वाच्या ५० स्थानकांत थ्रीडी सेल्फी बूथ आणि पाॅइंट्स उभारले आहेत. यासाठी तब्बल १.२५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्किल इंडिया, स्किल विल झिल, न्यू इंडिया मेडिसिन फोर्स फॉर ग्लोबल गॉड, डिजिटल इंडिया हम हैं डिजिटल, हम है नया भारत, स्पेस पॉवर नया भारत, नया भारत (घर) आवास की शक्ति, गॅस धुएं से मुक्ती -उज्वला की शक्ती, हर घर जल-जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया हम है डिजिटल, स्वच्छता एक कदम स्वच्छता की ओर, स्वच्छ भारत अशा केंद्र सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मध्य रेल्वेच्या स्थानकावर ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’ उभारण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाच विभागांतील प्रत्येकी दहा स्थानकांत हे सेल्फी बूथ आणि पाॅइंट्स उभारले आहेत. याबाबत किती खर्च झाला याविषयीची माहिती मिळविण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील उत्तरातून यासाठी तब्बल १.२५ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा… मंत्रालय क्रेडिट सोसायटी फसवणुकीप्रकरणी २६ जणांविरोधात गुन्हा; बायोमेट्रीक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांच्या फसवणुकीचा आरोप

५० पैकी ३० स्थानकांत तात्पुरत्या स्वरुपात आणि २० स्थानकांत कायमस्वरूपी सेल्फी बूथ आणि पाॅइंट्स उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरुपाचा एक सेल्फी बूथ, पॉइंटसाठी तब्बल १.२५ लाख रुपये मोजावे लागले. तर, कायमस्वरूपी एक सेल्फी बूथ, पाॅइंट्स उभारणीसाठी ६.२५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र ३० पैकी काही स्थानकांतील तात्पुरते सेल्फी पाॅइंट्स हटवविण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो रुपये वाया गेले आहेत. दररोज प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याऐवजी करदात्याचा पैसा केंद्र सरकार जाहिरातीवर खर्च करीत आहे, असे मत बोस यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi 3d selfie booths and 3d selfie points have been set up rs 125 crore has been spent for this mumbai print news dvr
Show comments