पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील मरोळ येथे बोहरा मुस्लीम समुदायाच्या अलजेमा-तूस-सैफी या संकुलाचं उद्घाटन केलं. तसेच बोहरा समुदायाविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यावेळी मोदींनी स्मितहास्य करत “माझी एक तक्रार आहे आणि मला वाटतं त्यात सुधारणा केली पाहिजे,” असं वक्तव्य केलं. ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) बोहरा समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “बोहरी समाजाच्या कार्यक्रमात येणं माझ्यासाठी कुटुंबात आल्यासारखं आहे. मी तुम्ही तयार केलेली चित्रफीत पाहिली. माझी एक तक्रार आहे आणि मला वाटतं त्यात सुधारणा केली पाहिजे. तुम्ही त्या चित्रफितीत वारंवार माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मी इथं पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही.”
“वारंवार माझा उल्लेख मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाला याबद्दल मला तक्रार”
“मला जी संधी मिळाली ती खूप कमी लोकांना मिळाली आहे. मी मागील चार पिढ्या या कुटुंबाबरोबर जोडलो गेलो आहे. या चारही पिढ्या माझ्या घरी आल्या आहेत. अशी संधी खूप कमी लोकांना मिळते. त्यामुळे या चित्रफितीत वारंवार माझा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असा उल्लेख झाला याची मला तक्रार आहे. मी तुमच्या कुटुंबातीलच सदस्य आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद, म्हणाले…
“दाऊदी समाजाने स्वतःला काळाच्या कसोटीवर कायम सिद्ध केलं”
“मला जेव्हा जेव्हा बोहरी समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला. दाऊदी समाजाने काळाच्या कसोटीवर कायम स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे उद्घाटन झालेलं हे संकुल,” असंही मोदींनी नमूद केलं.