PM Narendra Modi in Anant – Radhika Wedding : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लेकाचा म्हणजेच अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा मुंबईत १२ जुलै रोजी पार पडला. आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुभ आशीर्वाद सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्यात (Anant – Radhika Wedding) आज उपस्थिती दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील विविध उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष होतं. ६ हजार ६०० कोटींच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन, ६ हजार ३०० कोटींच्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन, ५ हजार ५४० कोटींच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ, ५२ कोटींच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११चे लोकार्पण,८१३ कोटींच्या कल्याण यार्ड रि-मॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी, ६४ कोटींच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्मचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.
Honourable PM Modi sir in grand Ambani wedding #AmbaniFamilyWedding #AmbaniWedding pic.twitter.com/OrdE4NSLRl
— Dr Gautam Bhansali (@bhansaligautam1) July 13, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला खुद्द मुकेश अंबानी हजर (Anant – Radhika Wedding)
हे कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचेही उ्घाटन केले. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant – Radhika Wedding) यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रम स्थळी हजेरी लावताच सर्वांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं. तसंच, स्वतःच्या जागेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. नववधू आणि नववराने नरेंद्र मोदी यांचे वाकून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर मुकेश अंबानी यांनी त्यांची सोबत केली.
हेही वाचा >> Anant-Radhika Wedding Live Updates: अंबानींच्या कार्यक्रमाला पोहोचले रजनीकांत
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा आहे. अत्यंत शाही आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील, जगभरातील, अत्यंत नावाजलेली, दिग्गज, देशी-परदेशी राजकीय मंडळी अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्यात आले आहेत. प्री-वेडिंग कार्यक्रमापासून या विवाह सोहळ्याची चर्चा होती. त्यानंतर, या अंबानी कुटुंबाने पालघर येथे जाऊन सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांनाही वस्तूरुपी आशीर्वाद दिले. त्यानंतर झालेले सोहळ्यातील विविध पद्धती आणि प्रथा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काल रात्री उशिराने या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालून एकमेकांसाठी वचनबद्ध झाले. त्यानंतर, आज शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचे (Anant – Radhika Wedding) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातही दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील विविध उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. मुंबईतील हे कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी मुकेश अंबानी यांच्या लेकाच्या लग्नात हजेरी लावली. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, शरद पवार आदी विविध दिग्गज नेतेही या शूभ आशीर्वाद कार्यक्रमात गेले आहेत.